Criminal Justice Season 3 : सस्पेन्सने भरलेल्या 'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर बघितला का?

Criminal Justice Season 3 : सस्पेन्सने भरलेल्या 'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर बघितला का?

मुंबई | Mumbai

लोकप्रिय वेबसीरिज 'क्रिमिनल जस्टिस'चा (Criminal Justice 3) तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'क्रिमिनल जस्टिस'च्या (Criminal Justice Season 3 Promo Out) तिसरा सीझनचा टीझर रिलीज झाला असून त्यामध्ये पंकज त्रिपाठी यांची झलक पाहायला मिळते आहे.

हा टीझर सस्पेन्सने भरलेला आहे. पंकज त्रिपाठी आपल्या जुन्या शैलीत एक नवीन केस लढताना दिसत आहेत. या मालिकेत पंकज वकील माधव मिश्रा यांची भूमिका साकारत आहे.

यात श्वेता बसू प्रसादही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. मालिकेत पंकज आणि श्वेता वकिलाच्या भूमिकेत समोरासमोर दिसत आहेत.

टीझर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक आता वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'क्रिमिनल जस्टिस'चा तिसरा सीझन प्रेक्षकांना २०२२ च्या अखेरीस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com