Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनप्रमुख भूमिका निभावतेय यावर विश्वास बसत नव्हता !

प्रमुख भूमिका निभावतेय यावर विश्वास बसत नव्हता !

नाशिक | Nashik

झी मराठीवर नुकतीच भेटीस आलेली ‘पाहिले न मी तुला’ हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि या मालिकेतील मनू म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले हिचा नवा चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद

- Advertisement -

तू मूळची कुठली आहेस?

– मी मूळची सिंधुदुर्गमधील कुडाळची असून, माझे बाबा बँकेत कामाला तर आई गृहिणी आहे त्यामुळे अभिनय क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नाही. मी ग्रॅज्युएशन कुडाळमध्ये तर मास्टर्स पुण्यात केलं आहे.

अभिनयाची गोडी कशी लागली?

– युथ फेस्टिवल्स पासून मी अभिनयाला सुरुवात केली. तिथे केलेलं स्किट मुंबई युनिव्हर्सिटीला फायनल्ससाठी सिलेक्ट झालं. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला.

अभिनयाची सुरुवात कुठून झाली?

– मागील ६ वर्षांपासून मी थिएटरमध्ये काम करतेय. कोकणात बाबा वर्दम थिएटरच्या माध्यमातून नाटकात अभिनयाची कारकीर्द सुरु झाली. कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. ललित कला केंद्रामध्ये नाट्यशास्त्रात मास्टर्स केलं आहे. मागच्या वर्षी पास झाले आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘कलरफुल’ या चित्रपटात मला संधी मिळाली. त्यानंतर लगेचच मला पाहिले न मी तुला या मालिकेची ऑफर मिळाली.

पाहिले न मी तुला हि मालिकेत तुला संधी मिळाली तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती?

– झी मराठी वरील मालिका मी लहानपणापासून पाहत आली आहे. ऑडिशन देत असताना आपल्याला झी मराठीवरील मालिका करायला मिळेल असं मला स्वप्नात ही नव्हतं वाटलं. प्रोमो शूट होऊन ऑन-एअर गेला तरीही माझा विश्वास नव्हता बसत. मी खरंच या मालिकेत आहे? असंच काहीसं फीलिंग होतं. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मिळाल्यावर ३ वर्ष अभ्यास करून अभिनयाकडे वळण्याचा निर्णय सार्थकी लागला असं वाटलं. या मालिकेचं दिग्दर्शन करणाऱ्या मनीष खंडेलवाल यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या