CLASS OF 83 चा ट्रेलर लॉन्च; बॉबी देओलचे पुनरागमन
मनोरंजन

CLASS OF 83 चा ट्रेलर लॉन्च; बॉबी देओलचे पुनरागमन

१९८३ बॅचमधील मुंबईतील ५ पोलीस अधिकाऱ्यांची गोष्ट यात मांडली आहे.

Nilesh Jadhav

"क्लास ऑफ ८३" सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च झाला. हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

या सिनेमातून अभिनेता बॉबी देओल IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात १९८३ बॅचमधील मुंबईतील ५ पोलीस अधिकाऱ्यांची गोष्ट यात मांडली आहे.

या सिनेमात बॉबी देओलसोबत श्रेया सरन, प्रियांशु चटर्जी, अमृता पुरी, पुलकित सम्राट, अनूप सोनी आणि पृथ्वीक प्रताप मुख्य भूमिकेत आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन अतुल सबरवाल यांनी केले असून हा सिनेमा सैय्यद युनुस हुसैन जैदी यांच्या 'क्लास ऑफ ८३' या पुस्तकावर आधारित आहे.

हा सिनेमा बॉलिवूडचा किंग शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीचा आहे. या कंपनीने अगोदर 'बार्ड ऑफ ब्लड' आणि 'बेताल' या दोन वेब सीरिज तयार केल्या आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com