अभिनेता सुशांतसिंह राजपूत
अभिनेता सुशांतसिंह राजपूत
मनोरंजन

सुशांतच्या फ्लॅटमध्ये पुन्हा एकदा ‘तो’ प्रसंग

सीबीआय सगळा घटनाक्रम तपासणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवेळी नेमक्या घटना कशा घडल्या. त्याचा बारीक अभ्यास करून सुशांतच्या बांद्र्याच्या फ्लॅटमध्ये त्याच्या मृत्यूचा प्रसंग पुन्हा एकदा वठवला जाणार आहे.

सुशांतच्या उंचीचा, त्याच्या वजनाचा आणखी एक सुशांत पुन्हा एकदा आत्महत्या करणार आहे. ते नाट्य असेल. sushant singh rajput death case

सुशांत प्रकरणी सीबीआय पुन्हा एकदा सगळा घटनाक्रम तपासून पाहील. सुशांतची उंची.. त्याच्या सीलिंगची असलेली उंची.. त्याचं वजन.. तिथला फॅन.. असं सगळं.. रिक्रिएट होईल. ही आत्महत्या खोटीच असेल. पण जास्तीत जास्त खर्‍या टर्मवर ते नाट्य घडणार आहे. सुशांतची आत्महत्या होती की हत्या याचा तपास करण्यासाठी हे नाट्य आवश्यक असल्याचं कळतं. CBI investigate Actor Sushant Singh Rajput's death

दरम्यान सुप्रीम कोर्टाने 19 ऑगस्टला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com