न्यूड फोटोशूट भोवले! रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल

न्यूड फोटोशूट भोवले! रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

सतत काहीना काही करत चर्चेत असलेल्या अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो शूट केले होते. या फोटोशूटमुळे रणवीर सिंहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रणवीर सिंहविरोधात सामाजिक संघटनेने मुंबईत (Mumbai) गुन्हा दाखल केला आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, अभिनेत्याने आपल्या न्यूड फोटोंसह (Nude Photoshoot) महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या नम्रतेचा अपमान केला आहे. तक्रारदाराने अभिनेत्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, चेंबूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीर सिंहने नुकताच एका पेपर मॅगझिनसाठी फोटोशूट केला आहे. यात अभिनेता रणवीर सिंह हा न्यूड अवतारात पोज देताना दिसून येत आहे. हे फोटोशूट म्हणजे 70 च्या दशकातील पॉप आयकॉन बर्ट रेनॉल्ड्स यांना श्रद्धांजली आहे. जो 1972 मध्ये कॉस्मोपॉलिटन मासिकासाठी शूट करताना नग्न झाला होता.

या फोटोशूटनंतर अनेक चर्चा रंगत आहे. रणवीरचे चाहते त्याच्या आत्मविश्वासाची प्रशंसा करत आहेत, तर सोशल मीडियावर रणवीर चांगलाच ट्रोल होत आहे. त्याच्या फोटोशूटवर अनेक मीम्सदेखील बनवण्यात आले आहेत. तसेच दीपिका पदुकोणसह (Deepika Padukone) अनेक अभिनेत्यांनी रणवीरच्या फोटोशूटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

न्यूड फोटोशूटबद्दल रणवीर सिंहने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, लोक माझे कपडे आणि फॅशनबाबत काय बोलतात या गोष्टीचा मला काहीही फरक पडत नाही. त्यांना जे कपडे घालायला आवडतात तेच कपडे ते घालतात ते जेवण ते जेवतात. माझ्याविषयी कोणाला हरकत असेल तर मला त्याचा कोणताही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com