
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांनीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला आहे. सोशल मीडियावर सध्या याच ट्रेलरची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरने (Brahmastra trailer) प्रेक्षकांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागली आहे.
या चित्रपटात अमिताभ बच्चन गुरूच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत आहे. दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनचीही चित्रपटात भूमिका आहे. महत्त्वाचं म्हणजे रणबीर कपूरला शिवाच्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते.
या चित्रपटाचा पहिला भाग या वर्षाच्या अखेरीस ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘स्टार स्टुडिओ’, ‘धर्मा प्रोडक्शन’, ‘प्राइम फोकस’ आणि ‘स्टारलाईट पिक्चर्स निर्मित’ हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.