'ब्रह्मास्त्र'ची जादू कायम; तिसऱ्या दिवशीही मालामाल

'ब्रह्मास्त्र'ची जादू कायम; तिसऱ्या दिवशीही मालामाल

मुंबई | Mumbai

बॉलिवूडमधील बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Actor Ranbir Kapoor) अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३७ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ४२ कोटींची कमाई करत चित्रपटाने देशांतर्गत १०० कोटींचा आकडा पार केला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम पाहायला मिळाली.

प्रदर्शानाच्या तिसऱ्या दिवशी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४६ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंड (Boycott Trend) निगेटिव्ह रिव्ह्यूजचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. तसेच देशभरात या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल आहेत.

दरम्यान, या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १२५ कोटींची तर वर्ल्ड वाइड २१० कोटींची कमाई केली आहे. तसेच काल दाक्षिणात्य भाषांमधील 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने १६ कोटींची कमाई केली. यातील तेलुगु भाषेतील चित्रपटाने आत्तापर्यंत सर्वाधिक १३ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दाक्षिणात्य भाषांमधील 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे व्हर्जन सोमवारी (दि.१२) बॉक्स ऑफिसवर १५ कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com