धैर्य, ढुंग्या, कबीर धुमाकूळ घालायला सज्ज; 'बॉईज 3’चा टीजर आला समोर

धैर्य, ढुंग्या, कबीर धुमाकूळ घालायला सज्ज; 'बॉईज 3’चा टीजर आला समोर

मुंबई | Mumbai

काही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'नी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. आता हे तिघे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत प्रेक्षकांना वेडं करायला.

नुकतेच 'बॉईज 3' चे टिझर (Boys 3 marathi movie Teaser )सोशल मीडियावर झळकले असून 16 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात हा धमाका उडणार आहे.

‘बॉईज’ चित्रपटामधील धैर्य, ढुंग्या आणि कबीर या पात्रांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘बॉईज २’ प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता पुन्हा एकदा ‘बॉईज ३’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com