Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनकमाल आर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कमाल आर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | Mumbai

चित्रपट समिक्षक आणि अभिनेता कमाल आर. खानला (Kamal Rashid Khan) आज सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. २०२० मध्ये वादग्रस्त ट्वीट केल्याबद्दल कमाल रशीद खान याला मालाड पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला आज बोरिवली न्यायालयात हजर करण्यात (Borivali Court) करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस २ वर्षांपासून कमालचा शोध घेत होती, मात्र कमाल मुंबईत नव्हता. मात्र काल पोलिसांना कमाल मुंबईत येत असल्याचे कळले आणि विमानतळावरूनच त्याला अटक केली गेली.

- Advertisment -

ताज्या बातम्या