ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा

ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांच्या  निधनाने बॉलीवूडवर शोककळा

मुंबई | Mumbai

आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूड (Bollywood) मध्ये संस्मरणीय स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे आज निधन झाले. 150 च्या आसपास चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप ठेवणारे जावेद गेल्या अनेक दिवसांपासून श्वसनाच्या आजाराशी (Respiratory disease) झुंज देत होते. आज १४ फेब्रुवारी रोजी, अखेर त्यांची नियतीशी असणारी झुंज संपली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.  

त्यांनी हिंदी चित्रपटांसोबतच अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले. अभिनयाच्या कारकिर्दीत जावेद यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan), आमिर खान आणि सलमान खान यांच्यासह बहुसंख्य बड्या चेहऱ्यांसोबत काम केले आहे. जावेद यांनी 2020 मध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर यांचा चित्रपट 'सडक २' मध्ये शेवटचे काम केले होते. 

राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये जावेद यांनी काम केले आहे. याशिवाय दूरदर्शनच्या 'नुक्कड' या प्रसिद्ध कार्यक्रमानेही त्यांना वेगळी ओळख दिली. त्यांनी गुलजार यांच्या 'मिर्झा गालिब'मध्येही (Mirza Ghalib) काम केले, ज्यामध्ये त्यांच्या फकीराच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले, याबरोबरच जावेद खान यांच्या कारकिर्दीत 'लगान', 'अंदाज अपना-अपना','चक दे इंडिया' (Chak de India) या चित्रपटांतील त्यांचा अभिनय अजरामर ठरणारा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com