कंगना पुन्हा बरळली! यावेळी थेट महात्मा गांधीवर साधला निशाणा; म्हणाली...

कंगना पुन्हा बरळली! यावेळी थेट महात्मा गांधीवर साधला निशाणा; म्हणाली...

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood actress kangana ranaut) आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिची अत्यंत बेजबाबदार अशी वक्तव्य सध्या वादग्रस्त होत आहेत. खासकरुन इतिहासाबद्दलची तिची विधाने सध्या चर्चेत आहेत. कंगनाने आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं नसून भीक मिळाली असल्याचं वक्तव्य अगदी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. (kangana ranaut on mahatma gandhi)

दरम्यान कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने यावेळी महात्मा गांधींवर (mahatma gandhi) निशाणा साधला असून सुभाषचंद्र बोस (subhash chandra bose) आणि भगतसिंग (bhagat singh) यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला (kangana ranau instagram post) काही पोस्ट शेअर केल्या असून आपले हिरो निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.

इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, 'तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.' पुढे कंगना म्हणाली, 'गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी.'

कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, 'जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागते, विचार करून तुमचे हिरो निवडा.'

दरम्यान कंगनाने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना भारताला १८९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं सांगत खरं स्वातंत्र्य नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मिळाल्याचं म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून कंगनाच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com