बॉलिवूडचे 11 सेलिब्रिटी करोना पॉझिटिव्ह
मनोरंजन

बॉलिवूडचे 11 सेलिब्रिटी करोना पॉझिटिव्ह

देशात फैलाव वाढतच आहे

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - देशात करोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे. दरम्यान बॉलिवूडमध्येही करोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. या जीवघेण्या विषाणूबाबत लोकांना सतत इशारा देणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह स्वतः बॉलिवूडचे 11 सेलिब्रिटी करोनाचे शिकार झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबियांना देखील करोनाची लागण झाली आहे. बच्चन कुटुंबियांनंतर बॉलिवूडमधील अनेक करोनाची प्रकरणे समोर आली आहेत.

अमिताभ बच्चन यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चनला देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर बच्चन कुटुंबातील उर्वरित सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या दोघींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. फक्त जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबात देखील करोनाचा शिरकाव झाला आहे. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी स्वतः ट्विटरद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. अनुपम खेर यांच्या आई दुलारी खेर आणि भाऊ राजू खेर यांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय त्यांच्या मेव्हणी आणि भाचीला देखील करोनाची लागण झाली आहे.

तसेच टीव्ही सीरियल कसोटी जिंदगी की फेम अभिनेता पार्थ समनाथ याचा देखील करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कसोटी जिंदगी की या सीरियलचे चित्रिकरण बंद झाले आहे. तसेच उंगली फेम अभिनेत्री रेचल व्हाइट हिला सुद्धा करोनाची लागण झाली आहे. तिने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ती सध्या होम क्वारंटाईन आहे. बालाजी टेलिफिल्म्सचे कार्यकारी उपाध्यक्षा तनुश्री दासगुप्ता यांचाही करोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच त्यांना डिस्जार्च देण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com