Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनसुशांत प्रकरणावरुन महाराष्ट्र-बिहार संघर्ष

सुशांत प्रकरणावरुन महाराष्ट्र-बिहार संघर्ष

पाटणा, मुंबई:

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपासावरुन आता महाराष्ट्र व बिहार असा संघर्ष सुरु झाला आहे. तपास जसजसा पुढे सरकत चालला आहे, तसतसा राजकीय पारा वाढत चालला आहे. सोमवारी बिहार विधानसभेत सुशांतसिंह मृत्युप्रकरणाचा मुद्दा उचलला गेला. सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज यांनी हा मुद्दा उचलून सीबीआय चौकशीची मागणी केली. विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव यांनी देखील सुशांतसिंह मृत्युप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. बिहार सरकारचे मंत्री जय सिंह यांनी महाराष्ट्र सरकार देशाच्या संघराज्यीय रचनेच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केले. मुंबई महानगरपालिकेने तिवारी यांना क्वारंटाइन करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यानंतर नितीश कुमार म्हणाले, विनय तिवारी यांच्यासोबत जे काही घडले, ते योग्य नाही. बिहार पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. आमचे डीजीपी त्यांच्याबरोबर बोलतील.

सुशांतच्या घरच्यांशी झालेल्या पहिल्या जबाबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. सुशांतवर सुरु असलेले उपचार आणि व्यावसायिक दडपणामुळे आत्महत्या केली असावी असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यानंतर त्याच्या वडीलांना नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या