Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनGrand Finale : कोण ठरणार ‘Bigg Boss 16’चा महाविजेता?

Grand Finale : कोण ठरणार ‘Bigg Boss 16’चा महाविजेता?

मुंबई | Mumbai

‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) आज शेवटचा दिवस आहे. बघता बघता 4 महिने पुर्ण झाले. घरातील सदस्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केले. या सिझनमध्ये आपण बरेच राडे, वाद पाहिले, त्याचबरोबर प्रेम आणि मैत्रीही पाहिली. घरतील मंडली तर सर्वांचीच लोकप्रिय झाली. आज शोचा फिनाले (Grand Finale) आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बिग बॉस 16 च्या ग्रॅंड फिनालेत प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary), शिव ठाकरे (Shiv Thakare), एमसी स्टेन (MC Stan), अर्चना गौतम (Archana Gautam) आणि शालिन भानोत (Shalin Bhano) हे पाचजण आहे. दरम्यान हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय Reality शो बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) होस्ट करत आहे.

Valentine Day : …आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बिग बॉस 16’ चा फिनाले आज रात्री पार पडणार आहे. दरम्यान शोच्या फिनालेची तयारी पूर्ण झाली आहे. शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा देखील आज मोठ्या थाटात केली जाईल. यावेळी विजेत्याचा मुकुट कोणाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे.

दरम्यान मराठी बिग बॉस सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे आता बिग बॉस 16 च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र सद्यस्थितीला कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण आहे. पण सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक व्हिडीओ मात्र बराच व्हायरल होताना दिसत आहे.

तंदूर रोटी ताटातून गायब होणार? सरकारने घातली बंदी; उल्लंघन केल्यास ५ लाखांचा दंड, जाणून घ्या कारण

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शिव ठाकरेचा हा व्हिडीओ बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा आहे. ज्याचं विजेतेपद शिवने जिंकलं होतं. व्हिडीओमध्ये होस्ट महेश मांजरेकर शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांचे हात पकडून उभे असलेले दिसत आहेत. सर्वजण विजेत्याचं नाव घोषित केलं जाण्याची वाट पाहत आहेत आणि अशातच महेश मांजरेकर शिव ठाकरेचं नाव विजेता म्हणून घोषित करताना दिसत आहेत. शिव स्वतःही हे ऐकून आश्चर्यचकीत होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या