अभिनेता अरमान कोहलीला अटक; काय आहे प्रकरण?

अभिनेता अरमान कोहलीला अटक; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

बिग बॉसचा फेम (Bigg Boss) अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अरमान कोहलीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Narcotics Control Bureau) अटक केली आहे.

शनिवारी संध्याकाळी NCB ने अरमान कोहलीच्या (Arman Kohli) मुंबईतील (Mumbai) घरावर छापा टाकला होता. त्यावेळी अरमानच्या घरात काही ड्रग्ज (Drugs) अढळून आले. त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती. आज सकाळी अरमानला या (Drugs Case) प्रकरणी अटक केली आहे. (Actor Armaan Kohli's troubles escalate)

NCB ने एका ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. त्याच्या चौकशीत अरमानबाबतची माहिती मिळाल्यानंतर NCB ने शनिवारी अरमानच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. छाप्यावेळी अरमानच्या घरात ड्रग्ज आढळले असून एनसीबीने ते जप्त केले आहेत.

अरमानला चौकशीसाठी NCB च्या कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशीनंतर अरमानला अटक करण्यात आली. या प्रकरणात बॉलीवूडमधील (Bollywood) आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या चौकशीतून ड्रग्जप्रकरणी (Drug case) महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशीसाठी अरमानला अटक (Armaan Kohli arrest) करण्याचे सांगण्यात आले आहे.

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या (Actor Sushant Singh Rajput's suicide) निमित्तानं बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Bollywood Drugs case) पुढे आलं होतं. त्यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची (Bollywood celebrities) नावं समोर आली होती. आताही सातत्यानं अंमलीपदार्थांच्या बाबत कलाकारांची नावं पुढं येताना दिसत आहे. या प्रकरणाबाबत सांगायचं झाल्यास, बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या घडामोडी येण्यास सुरुवात झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com