Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनतब्बल सात वर्षांनी एकत्र काम करणार 'बिग बी' आणि 'अजय देवगण'

तब्बल सात वर्षांनी एकत्र काम करणार ‘बिग बी’ आणि ‘अजय देवगण’

मुंबई | Mumbai

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. चाहते पुन्हा एकदा या दोन्ही सुपरस्टार्सना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहू शकणार आहे. तब्बल सात वर्षांनी अमिताभ बच्चन आणि अजय देवगन पुन्हा एकत्र काम करणार आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध ट्रेड अनलिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन आणि अजय देवगनची जोडी सात वर्षानंतर ‘मे डे’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमामध्ये अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण या सिनेमामध्ये पायलटची भूमिकाही करणार आहे. डिसेंबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अजय देवगण या सिनेमामुळे प्रचंड खूश आहे. कारण तो पहिल्यांदाच खुद्द अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. भुज द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमाच्या कामामध्ये सध्या अजय देवगण व्यस्त आहे. त्या सिनेमाचं काम पूर्ण करुन तो मेडे सिनेमाच्या कामाला सुरुवात करणार आहे. अजयचे वडील ‘वीरू देवगन’ बिग चे दिग्दर्शित झाले होते. ‘मेडे’ पूर्वी बिग बी आणि अजय यांची जोडी ‘मेजर साहब’, ‘खाकी’ आणि ‘सत्याग्रह’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसली होती. शेवटच्या वेळी प्रकाश झाच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटात दोघांना एकत्र पाहिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या