पहिल्याच दिवशी 'भोला'ची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई

पहिल्याच दिवशी 'भोला'ची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) 'भोला' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयातून अॅक्शनचे जबरदस्त सादरीकरण करत आहे.

हा चित्रपट 'कैथी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कमाई केली आहे.

रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'भोला' या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अजय देवगणने दिग्दर्शन आणि अभिनयही यात केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याबरोबरच चित्रपट समिक्षकांनी देखील चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया दिली असून 'भोला' (Bhola) त्यांच्या पसंतीस उतरला आहे.

यामुळे 'भोला'ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. माध्यमांसमोर आलेल्या माहितीनुसार, भोला चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com