भारत गणेशपुरे, सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शो सोडणार?

भारत गणेशपुरे, सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शो सोडणार?

मुंबई । Mumbai

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तर निलेश साबळे (Nilesh Sable) हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो...

गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugade),भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि सागर कारंडे (Sagar Karande) भाऊ कदम ( Bhau Kadam) हे कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील त्यांच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

तसेच 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून लवकरच भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघे निरोप घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या सोनी टिव्हीवरील (Sony TV) 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' (India's Laughter Champion) या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये भारत आणि सागर हे दोघे प्रेक्षकांना हसवताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचे परीक्षण अर्चना पुरण सिंह (Archana Puran Singh) आणि शेखर सुमन (Shekhar Suman) हे करणार आहेत. त्यामुळे भारत आणि सागर हे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामधून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com