देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या 'भानू अथय्या' यांचं निधन

त्या ९१ वर्षांच्या होत्या
देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या 'भानू अथय्या' यांचं निधन

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या (Bhanu Athaiya) यांचं निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला जगप्रसिद्ध आणि मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी भानू यांनी ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. ब्रिटिशांविरुद्ध लढ्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींवर एका ब्रिटिशानं सिनेमा काढावा, हा निव्वळ योगायोग नव्हता. गांधींवर चित्रपट निर्माण करण्यासाठी रिचर्ड एटनबरोनी घेतलेले परिश्रम वादातीत होते.

'गांधी' चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर प्रचंड सन्मान मिळाला आणि त्यांची वेगळी ओळखही निर्माण झाली. चित्रपटात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफ़री यांसारख्या अनेक भारतीय कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या. कलाकारांच्या अभिनयासोबतच आणि कलाकारांची वेशभूषेचं अर्थाच भानू यांचं प्रचंड कौतुक झालं होतं. अभिनेता शाहरूख खान याचा 'स्वदेस' हा सिनेमा भानू अथय्या यांचा शेवटचा सिनेमा होता ज्यात त्यांनी वेशभूषा डिझाइन केल्या होत्या. भानू अथय्या यांनी अनेक सिनेमांत आपले योगदान दिले आहे. गुलजार यांच्या 'लेकीन' (१९९०) आणि आशुतोष गोवारिकर यांच्या 'लगान' (२००१) या सिनेमांसाठी भानू अथय्या यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com