मनोरंजन सृष्टीवर पुन्हा दुःखाचा डोंगर; शूटिंगवरून परतल्यानंतर अभिनेत्याचे निधन

मनोरंजन सृष्टीवर पुन्हा दुःखाचा डोंगर; शूटिंगवरून परतल्यानंतर अभिनेत्याचे निधन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अनेक मालिका आणि रिएलिटी शो गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचे रात्री उशीर अकाली निधन झाले. या निधनामुळे मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे....

प्रसिद्ध बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी (Abhishek Chatrjee) यांनी 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल (दि २३) रात्री उशिरा एका रिएलिटी शोचे शूटिंग संपवून ते घरी परतले. यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

पुढील काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, टॉलिवूड म्हणजेच बंगाली टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिषेक चॅटर्जी हे बुधवारी रात्री शूटिंगवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

घरी आल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या, मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांनतर त्यांना घरीच सलाईन लावण्यात आली.

मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण होते अभिषेक चॅटर्जी?

  • अभिषेक चॅटर्जी हे बंगाली टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा

  • 'इच्छादी', 'पिता', 'अपूर सांगा', 'अंदरमहल', 'कुसुम डोला', 'फागुन बू', 'खारकुटो' यांसारख्या मालिकांमधील त्यांचा अभिनय गाजला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com