Monday, April 29, 2024
HomeमनोरंजनBaloch : दसऱ्याला झळकणार सीमापार लढलेल्या मराठ्यांची 'विजयगाथा'

Baloch : दसऱ्याला झळकणार सीमापार लढलेल्या मराठ्यांची ‘विजयगाथा’

नाशिक l प्रतिनिधी Nashik

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे ‘बलोच’. (baloch) महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Foundation day) औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) झळकले आहे. पानिपतच्या (Panipat) पराभवांनंतर बलुचिस्तानातील (balochistan) गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे….

- Advertisement -

या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे (Pravin Tarade) यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत, जीवन जाधव, महेश करवंदे (निकम) संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, जितेश मोरे, सहनिर्माते गणेश शिंदे, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार निर्मित हा चित्रपट २०२२ मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टरमध्ये बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसत आहेत. या सर्वांमध्ये प्रवीण दवणे यांची करारी मुद्रा सर्वांच्या नजारा खिळवून घेणारी आहे. त्यांच्या डोळ्यांतील धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता ‘बलोच’च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे. (balochistan_

- Advertisment -

ताज्या बातम्या