'आर्यन'चे चित्रपटसृष्टीत पदार्पण

'आर्यन'चे चित्रपटसृष्टीत पदार्पण

नाशिक | Nashik

'आला आला आला आला खुर्चीचा राजा आला' अशी टॅगलाईन म्हणत खुर्ची (Khurchi) सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांचा भेटीस आले आहे. पोस्टरच्या शेवटी एक लक्षवेधी चेहरा सत्तेच्या खुर्चीत राजासारखा बसलेला असून त्याच्या हातात बंदूक पाहायला मिळत आहे, हा चेहरा म्हणजे अभिनेता आर्यन....

आर्यन या चित्रपटात राजवीर राजाराम देसाई (Rajveer Rajaram Desai) या नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आर्यन खुर्ची (Khurchi) या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

वयाच्या पाचव्या वर्षांपासून फॅशन मॉडलिंग (Fasion Modeling) क्षेत्रात पदार्पण करून त्यानंतर आर्यनने अभिनयक्षेत्रात बरीच पारितोषिक पटकवली.

"खुर्ची हा माझा पहिलाच चित्रपट असून मी पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिका साकारताना खूप मज्जा आली. बरेच काही शिकायला मिळाले'. विशेष म्हणजे आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या मोशन पोस्टर मध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासंदांचे प्रेम, प्रचार याचे हुबेबुब वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे (Santosh Vasant Hagvane) यांची असून दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रितम एस के पाटील (Pritam S K Patil) यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी (Yogesh KolI) यांनी सांभाळली.

खुर्चीसाठी खेळली जाणारी लढाई खेळताना त्याचा इतरांवर आणि लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आर्यनला या खुर्ची चित्रपटात सत्तेसाठीच्या खुर्चीवर बसलेले पाहून चित्रपटात नेमके काय घडले असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com