अर्चना निपाणकर अडकली विवाहबंधनात

अर्चना निपाणकर अडकली विवाहबंधनात

अर्चनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले

मुंबई -

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्चना निपाणकर नुकताच विवाहबंधनात अडकली आहे. पार्थ रामनाथपूर याच्यासोबत तिने लग्न केलं आहे. अर्चनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचा फोटो शेअर हे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लग्नाचा फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अर्चना आणि पार्थ कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते. कालांतराने त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी नातं पुढं नेण्याचा निर्णय घेतला. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोघांना लग्न थाटामाटात करता आलं नाही.

त्यामुळे काही कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पाडला. दाक्षिणात्य पद्धतीनं विवाहसोहळा पार पडल्याचं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर अर्चनाचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अर्चनाने ‘का रे दुरावा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अभिनेता आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडितसोबत ‘100 डेज’ मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली. ‘राधा प्रेम रंगी रंगली’मलिकेमधील खलनायकाची भूमिका चांगलीच चर्चेत आली होती.

मालिकांमध्ये भन्नाट भूमिका साकारल्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवळा ‘पानिपत’ सिनेमात राघोबादादा पेशवे यांच्या पत्नीची म्हणजेच आनंदीबाईची भूमिका साकारली होती.

Deshdoot
www.deshdoot.com