Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनसंगीतकार ए.आर.रेहमान यांच्या आईचे निधन

संगीतकार ए.आर.रेहमान यांच्या आईचे निधन

चेन्नई l Chennai

‘ऑस्कर’ विजेता गायक-संगीतकार ए.आर.रहमान यांच्या आईचे आज (28 डिसेंबर) निधन झाले आहे. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. करीमा यांचे खरे नाव कस्तुरी होते. रेहमान यांनी आपले दिलीप कुमार हे नाव बदलून जेव्हा रेहमान केले होते, त्यावेळी करीमा यांनीही आपले नाव बदलले होते.करीमा गेल्या वर्षभरापासून आजारी होत्या. 28 डिसेंबर रोजी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करीमा बेगम यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार होतील.

रहमान प्रत्येक खास प्रसंगी आपल्या आईचा उल्लेख करत. आपल्या आईनेच आपल्यातील संगीत आणि आपले कलागुण ओळखले, असे रहमान नेहमी म्हणत. स्वतःच्या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी करीमा बेगम यांना दिले होते. ए.आर. रहमान यांनी एका मुलाखती दरम्यान आपल्या आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आमचे नाते चित्रपटात दाखवतात तसे नव्हते. आम्ही कधी एकमेकांची गळाभेट घ्यायचो नाही. तरीही तिचे माझ्यावर खूप प्रेम होते. मझ्यासाठी काय योग्य हे तिलाच जास्ती ठावूक असल्याचे ए.आर.रहमान म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या