अनुपम खेर यांचे 'कही ये वो तो नही' गाणे तुफान व्हायरल

अनुपम खेर यांचे 'कही ये वो तो नही' गाणे तुफान व्हायरल

मुंबई | Mumbai

सध्या सर्वत्र ओमायक्रॉन (Omicron) या करोनाच्या (Corona) नव्या व्हेरीयंटची चर्चा आहे. देशभरासह राज्यात ओमायक्रॉनशिवाय दुसरा विषय नाही. ओमायक्रॉनच्या संसर्गाची क्षमता तिप्पट आहे. त्यामुळेच ओमायक्रॉन बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नेमके यावरच बोट ठेवणारा एक व्हिडीओ कू (Koo) या ॲपवर प्रसारित केला आहे…

हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून वेगाने तो व्हायरलदेखील (Viral) होत आहे. ओमायक्रॉन फुफुसावर आक्रमण करीत नाही. तर घशाला बाधित करतो. अनुपम खेर यांनी आपल्या व्हिडीओतून ही बाब सांगितली आहे. यासाठी त्यांनी 'कही ये वो तो नही' या गाण्याची पॅरोडी केली आहे.

या ओळीतून साधे खाकरले तरी घाबरल्यासारखे होते अशी मजेदार भावना व्यक्त केली आहे. त्यांनी मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com