तपास सीबीआयकडे जाताच अंकिता लोखंडेची पहिली प्रतिक्रिया
मनोरंजन

तपास सीबीआयकडे जाताच अंकिता लोखंडेची पहिली प्रतिक्रिया

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिला. बुधवारी याबाबतची सुनावणी पार पडली.

सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सुनावणीनुसार बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. शिवाय बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या सर्व प्रकरणात मुबंई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं, तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून केस ङ्गाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच सत्याचा विजय होतो असं म्हणत प्रतिक्रिया दिल्या. सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनंही लगेचच याबाबतचं आपलं मत मांडलं. नेहमी सत्याचाच विजय होतो, या आशयाचं टिवट करत अंकितानं न्यायदेवतेचा फोटो पोस्ट केला.

अंकिताव्यकिरिक्त सुशांतच्या कुटुंबीयांसह इतरही सेलिब्रिˆटींनी या निर्णयाचं स्वागत करत आता सुशांतला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com