'... तेरे प्यार का गम'; अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची चर्चा

'... तेरे प्यार का गम'; अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची चर्चा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना गायनाची (Singing) प्रचंड आवड आहे. आजवर त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झालेली आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांनी महाराष्ट्राला (Maharashtra) वेड लावले असून आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस नवे गाणे घेऊन सज्ज झाल्या आहेत...

खुद्द अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter account) आपल्या नव्या गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. "लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना… लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना …!" असे कॅप्शन देत त्यांनी आपले नवे गाणे लवकरच येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी अमृता फडणवीस यांनी सारेगम या म्युझिक कंपनीचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्यातून गोल्डन मेलोडी पाहायला मिळणार आहे. माय लव्ह’ या १९७० मध्ये आलेल्या चित्रपटातील गाण रिक्रिएट करत अमृता फडणवीस यांनी ते वेगळ्या अंदाजात आणले आहे. अभिनेते शशी कपूर (Actor Shashi Kapoor) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांच्यवर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. तसेच अमृता यांनी याआधी 'शिवतांडव', 'तेरी बन जाऊंगी अकॉस्टिक', 'ये नयन डरे डरे', 'मोरया रे', 'बेटिया प्राइड ऑफ नेशन', 'सड्डी गल्ली रेल गड्डी', 'कुणी म्हणाले', 'तिला जगूद्या', 'पेटूनी उठू दे आज', अशी अनेक हिट गाणी केली आहेत. त्यामुळे आता त्यांचं नवं गाणं कसं असेल? याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com