अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

मुंबई | Mumbai

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) होय.

अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात
Nashik : मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून समृद्धीच्या टोलची तोडफोड; अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने कार्यकर्ते संतप्त

'बिग बॉस'च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशातच आता अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा साखरपुडा झाला असून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात
IND A vs PAK A : आज महामुकाबला! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार फायनलचा थरार... कधी अन् कुठे पहायचा सामना?

याबाबत अभिनेत्री अमृता देशमुख हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आमचा साखरपुडा (Engagement) झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे हटके कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तर अमृता आणि प्रसादने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने साखरपुड्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यात अमृता आणि प्रसादच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. तसेच प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसत असून अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिनशल ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात (Marriage) अडकणार आहेत.

अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात
तलावात बस कोसळून भीषण अपघात ; १७ जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान अमृता देशमुखने 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने 'फ्रेशर्स', 'देवा शप्पथ', 'मी तुझीच रे', 'आठशे खिडक्या नऊशे दार' या मालिकेत विविध भूमिका साकारल्या होत्या. यानंतर ती अनेक मराठी चित्रपटातही झळकली. तर सध्या अभिनेता प्रसाद जवादे कलर्स मराठीवरील (Colors Marathi) काव्यांजली-सखी सावली या मालिकेत काम करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com