
मुंबई| mumbai
साउथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (allu arjun) आणि अभिनेत्री रष्मिका मानधना (rashmika mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पुष्पा: द राईज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले होते. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा’मधील (Pushpa) अल्लू अर्जुनच्या स्टाईलने, त्याच्या डायलॉग्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. यानंतर आता मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर आली आहे...
पुष्पा: द रुलच्या निर्मात्यांनी पुष्पाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. निर्मात्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे. 20 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये 'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तो आता कुठे आहे हे लवकरच कळेल. 'शोध लवकर संपेल' असे टीझरमध्ये लिहिले आहे.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज हा पहिला भाग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने, त्याच्या डायलॉग्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. यानंतर आता मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर आली आहे.
'पुष्पा २' चित्रपटाचा अनाऊन्समेंट टीझर आज प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. या टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना एकाच प्रश्न पडला आहे की “पुष्पा कुठे आहे?” तर टीझरमध्ये ‘पुष्पा २’चा संपूर्ण टीझर म्हणजेच ७ मार्च रोजी दुपारी रिलीज होईल.
पहिल्या भागात पुष्पाचा बेधडक स्टाईलने अखेर करण्यात आला होता . त्यामुळे या भागात पुष्पाचा आणि पोलिसांचा पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार हे नक्की आहे. त्यांमुळे आता ७ एप्रिलची सर्वजण वाट बघत आहे.