Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनआलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा टीझर प्रदर्शित

आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर प्रदर्शित

मुंबई l Mumbai

येत्या काही दिवसात अनेक बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांचा

- Advertisement -

आगामी सिनेमा ‘गंगूबाई काठियावाडी’चं टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आल आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा येत्या ३० जुलैला प्रदर्शित होत आहे. आलिया भट व्यतिरिक्त यात विजय राज, हुमा कुरेशी, शंतनु माहेश्वरी आणि सीमा पहावा दिसणार आहेत.

१ मिनिट ३१ सेकंदाच्या या टीझरमध्ये संपूर्ण आलिया भट्टवरच केंद्रीत आहे. टीझरची सुरूवात व्हॉईस ओव्हरने होते. ज्यात म्हटले गेले आहे की, ‘कहते हैं कि कमाठीपुरा में कभी अमावस की रात नहीं होती क्योंकि वहां गंगू रहती है.’ यात आलिया भट्टची जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली आहे. ज्यात ती म्हणते, ‘गंगू चांद थी और चांद ही रहेगी.’ त्यानंतर एकसे एक आलियाचे लूक प्रेक्षकांसमोर येतात. या टीझरमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. काही मिनीटात हजारो लाईक्स या टीजरला मिळाले आहेत. टीजर बघूनच प्रेक्षकांनी आलियाच्या कामाच कौतुक केलं आहे.

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?

माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातच्या काठियावाडमध्ये राहणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांना काठियावाडी म्हटले जात असे. लहान वयात गंगूबाईंना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. कुख्यात गुन्हेगार गंगूबाईंकडे येत. मुंबईच्या कमाठीपुरा भागात गंगूबाई ‘कोठा’ चालवायच्या. या गंगूबाईनी सेक्सवर्करच्या मुलांसाठी प्रचंड मोठे काम केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या