Monday, April 29, 2024
HomeमनोरंजनOur baby… coming soon! आलिया आणि रणबीरने दिली गूड-न्यूज

Our baby… coming soon! आलिया आणि रणबीरने दिली गूड-न्यूज

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचं स्वीट कपल रणबीर कपूर- आलिया भट्ट यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रणबीर-आलिया यांनी लग्नानंतर काहीच दिवसांत गूड-न्यूज (Good News) दिली आहे.

- Advertisement -

आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट (Instagram account) वरून अल्ट्रासाऊंडचा एक फोटो शेअर करत, आमचं बाळ येतंय अशी गोड बातमी दिली. (Alia Bhatt -Ranbr Kapoor announce pegnancy) आलिया या फोटोमध्ये हसताना दिसतेय. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं आहे Our baby … coming soon.

आलियानं शेअर केलेल्या फोटोला तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, ईशान खट्टर, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, आलिया आणि रणबीर कपूर दोघे आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या