BELL BOTTOM
BELL BOTTOM
मनोरंजन

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट 'बेल बॉटम'ची शुटिंग पुढील महिन्यात सुरू

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटाचे सगळे कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक यूके येथे शुटिंग साठी जाण्याच्या तयारीत आहे.

Nilesh Jadhav

सुपरस्टार अक्षय कुमारचा "बेल बॉटम" हा चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शूटींग यूके येथे करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम तयारीला लागली आहे.

ऑगस्टमध्ये चित्रपटाच्या पहिल्या भागाची शुटिंग सुरू होणार आहे. भारतात वाढत्या करोनामुळे शुटिंगसाठी करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेला आणि काम करण्यासाठी सरकारची मुभा असलेले ठिकाण शोधण्याचे काम सुरू होते. निर्मात्यांनी यूके या देशाची निवड केली आहे.

या चित्रपटात अनेक मोठ्या कलाकार काम करणार आहे. या मध्ये अक्षय कुमार, वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी या सारख्या मोठ्या कलाकारांचा भरणा आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन "लखनऊ सेंट्रल" या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत एम तिवारी करणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com