Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनया तीन देशात अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी

या तीन देशात अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी

मुंबई- Mumbai

19 ऑॅगस्टला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ Bell Bottom हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. पण तीन अरब देशांमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

ही बंदी चित्रपटातील एका दृश्यामुळे घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सौदी अरब, कुवेत आणि कतार Saudi Arabia, Kuwait and Qatar या तीन देशांमध्ये अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ Bell Bottom चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या देशातील सेन्सॉर बोर्डांनी चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला या देशात परवानगी नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात तीनही देशांची प्रतिमा खराब दाखवण्यात आल्याचा दावा करत यूएई सेन्सॉर बोर्डाने UAE Censor Board चित्रपटावर बंदी घातली आहे. तसेच या चित्रपटात काही ऐतिहासिक घटनांमध्ये देखील बदल केल्याचा सेन्सॉर बोर्डाचा आरोप आहे. या चित्रपटात लाहोरहून विमानाचे अपहरण करून ते दुबईत आणले जाते आणि जिथे भारतीय अधिकारी एक सिक्रेट मिशन पूर्ण करतात, असे दाखवण्यात आले आहे.

तर यूएई सेन्सॉर बोर्डाच्या म्हणण्यानुसार या अपहरणकर्त्यांना संयुक्त अरब अमीरातच्या फोर्सने पकडले होते. तसेच यूएईच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांने या प्रकरणाची दखल घेतली होती, असे म्हटले जात आहे. पण चित्रपटात वेगळी स्थिती दाखवण्यात आल्याचे म्हणत या तीन देशात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या