Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनअक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव बदलले

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव बदलले

मुंबई । Mumbai

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान (Emperor Prithviraj Chauhan) यांची जीवनगाथा (Life story) मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

मात्र या चित्रपटाच्या नावाला करणी सेनेने (Karni Sena) विरोध करत चित्रपटाविरोधात करणी सेनेने जनहित याचिका (Public interest litigation) दाखल केली होती. त्यानंतर चित्रपटाचे निर्माता अक्षये विधानी (Akshay Vidhani) यांनी चित्रपटाच्या नावात बदल केला आहे…

याबाबत करणी सेनेच्या अध्यक्षांना यशराज फिल्म्सचे (Yashraj Films) सीईओ अक्षये विधानी यांनी पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांपासून यशराज फिल्म्स भारतीय सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात यशराज फिल्म्सने अनेक सर्वोत्तम सिनेमा दिले आहेत. सातत्याने आम्ही रसिकांचे मनोरंजन करत आहोत आणि करत राहू. आमच्या सिनेमाच्या सध्याच्या नावासंबंधी तुमची जी तक्रार होती त्याची आम्ही दखल घेतली आहे. यावर आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावतील किंवा शूर योद्धा पृथ्वीराज चौहान (Prithviraj Chauhan) यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ.

उलट आम्ही त्यांच्या शौर्याचे कामगिरीचे आणि देशाच्या इतिहासात दिलेले योगदान याचा आदर करतो. यासंदर्भात आपल्यामध्ये अनेकदा झालेल्या चर्चांनंतर शांततेत आम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचे नाव बदलून ते ‘सम्राट पृथ्वीराज’ (Emperor Prithviraj)असे करू.आम्ही श्री राजपूत करणी सेना (Rajput Karni Sena) आणि त्यांच्या सदस्यांचे आभार मानतो की, तुम्ही आमच्या चित्रपटासंबंधीच्या भावना समजून घेतल्या”, असे यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षये विधानी यांनी करणी सेनेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच पृथ्वीराज’ या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार (Akshay Kumar) दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Miss World Manushi Chhillar) बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे.

तर या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सोनू सूद (Sonu Sood) आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि मानव वीज (Manav Vij) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (Dr. Chandraprakash Dwivedi) यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या