अजय देवगणच्या ‘भोला’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

अजय देवगणच्या ‘भोला’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

मुंबई | Mumbai

अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू असतानाच अजयने त्याच्या आणखीन एका आगामी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.

अजयच्या ‘भोला’ या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. हा चित्रपट त्याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. यात त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तब्बू काम करताना दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यावर तब्बूने अजयसाठी एक खास पोस्टही लिहिली होती. त्यामुळे या चित्रपटाची खूप आतुरता होती. आता अखेर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

या टीझरच्या सुरुवातीला अनाथाश्रमातील एक महिला ज्योती नावाच्या लहान मुलीला शोधत असते. दुसऱ्या दिवशी तिला कोणीतरी भेटायला येणार आहे, असं ज्योतीला ती महिला सांगते. आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याशिवाय अजून कोण नातेवाईक असतं, असा प्रश्न त्या ज्योतीला पडतो. त्यानंतर टीझरमध्ये अजयची झलक पहायला मिळते. तुरुंगात भगवदगीता वाचत असलेल्या एका कैदीला बाहेर जायची वेळ आली आहे असं सांगण्यात येतं. हा कैदी दुसरा-तिसरा कोणी नसून अजयच असतो.

“तो कुठून आला आहे आणि कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. ज्यांना माहीत झालं, ते जिवंत राहिले नाही”, असं दुसरा कैदी त्याच्याविषयी बोलत असतो. तो जेव्हा कपाळावर भस्म लावतो, तेव्हा लोकांना भस्मसात करतो, असं म्हटलं जातं, असाही एक संवाद या टीझरच्या अखेरीस ऐकायला मिळतं. अजय देवगणच्या जबरदस्त ॲक्शन सीनने या टीझरचा शेवट होतो. यावेळी त्याच्या हातात त्रिशूळ पहायला मिळतं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com