अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या

अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या

या वादात माजी मुख्यमंत्र्यांचीही एंट्री

मुंबई | Mumbai

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरहिट खलनायक किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यात जोरदार ट्विटर वॉर रंगलं आहे.

हे ट्विटर वॉर किच्चा सुदीपच्या एका व्हिडिओ मुलाखतीवरून सुरू झाले आहे. त्या मुलाखतीमध्ये किच्चा सुदीपने हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचं म्हटलं. किचा सुदीपच्या या वादग्रस्त विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावर प्रतिक्रिया देताना अजय देवगणने किच्चा सुदीपला चोख प्रत्युत्तर दिलं.

अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या
'श्रुती हसन'चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

अजय देवगणने ट्वीट करत म्हटले आहे की, 'सुदीप, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन.'

नेमकं काय म्हणाला होता किच्चा सुदीप ?

पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनत आहेत, मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये आज पॅन इंडियाचे चित्रपट बनत आहेत. तो तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक बनवत आहे, परंतु त्यानंतरही तो संघर्ष करत आहे. आज आम्ही ते चित्रपट बनवत आहोत जे जगभरात पाहिले जात आहेत. किचा सुदीपचे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले आणि या प्रकरणाने पेट घेतला.

अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

दरम्यान किच्चा सुदीपने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. किच्चा सुदीपने सलग तीन ट्विट करत यावर त्याचे मत मांडले. यातील पहिल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, 'सर, मी ज्या संदर्भात हे वक्तव्य केले होते, तो मुद्दा तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. कदाचित मी तुम्हाला भेटल्यावर माझा संपूर्ण मुद्दा तुमच्यासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकेन. मला असे बोलायचे नव्हते. कोणाच्याही भावना दुखावणे, कोणत्याही वादाला तोंड फोडणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे, मी हे असे का करेन सर.'

'सर, मी आपल्या देशाच्या प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर करतो. हा विषय इथेच थांबावा अशी माझी इच्छा आहे. कारण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. तुम्हाला नेहमी खूप प्रेम आणि शुभेच्छा. लवकरच भेटूया..' असेही सुदीपने म्हंटले आहे.

पुढे तो म्हणतो, 'सर, तुम्ही हिंदीत पाठवलेला मजकूर मला समजला. कारण आम्ही सर्व हिंदीचा आदर करतो, प्रेम करतो आणि ती शिकण्याचा प्रयन्त करतो. हरकत नाही सर. पण मी जर कन्नड भाषेत बोललो असतो तर काय झाले असते असा सहज विचार मनात येऊन गेला. आम्हीही याच भारताचा भाग आहोत नाहीका,' असे ट्विट सुदीपने केले आहे.

अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या
गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

या वादात माजी मुख्यमंत्र्यांचीही एंट्री

दरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामीदेखील या वादात सामील झाले आहेत. कुमारस्वामी यांनी ट्विट करून अजय देवगणच्या वागण्याला हास्यास्पद म्हटले आहे. या होत असलेल्या वादावरून त्यांनी अजयला त्याच्या पहिल्या चित्रपटाची आठवणही करून दिली आहे. एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, अजय देवगणने हे लक्षात घेतले पाहिजे की कन्नड चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला पराभूत करत आहे. कन्नड लोकांच्या प्रोत्साहनामुळे हिंदी चित्रपट उद्योग विकसित झाला आहे. देवगणने हेदेखील विसरू नये की त्याचा पहिला चित्रपट फूल और कांटे बंगळुरूमध्ये वर्षभर चालला होता.

अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या
आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

Related Stories

No stories found.