ऐश्वर्या, आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह
मनोरंजन

ऐश्वर्या, आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह

रुग्णालयातून डिस्चार्ज

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई । Mumbai

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती अभिषेक बच्चन याने ट्विटरद्वारे दिली आहे.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या व आराध्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. दरम्यान अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. या दोघांना पुढील काही दिवस वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

अभिषेक बच्चनने ट्विटरवर याबाबत सांगितले कि, ‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असे म्हटले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com