Adipurush Trailer : जय श्री राम..! बहुचर्चित 'आदिपुरुष' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Adipurush Trailer : जय श्री राम..! बहुचर्चित 'आदिपुरुष' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे.

केवळ चित्रपटच नव्हे तर, चाहते त्याच्या ट्रेलरचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरवर टीका झाल्यानंतर ओम राऊत यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकली. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबईमध्ये चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर लाँचा मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित होते.

Adipurush Trailer : जय श्री राम..! बहुचर्चित 'आदिपुरुष' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO
Bus Accident : भीषण अपघात! बस पुलावरून कोसळून १५ ठार, २५ जखमी... बचावकार्य सुरू

आदिपुरुष सिनेमात श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग, लंकापती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान तर हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा देवदत्त नागे दिसत आहे. .सिनेमात रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटना पाहायला मिळत आहेत.

Adipurush Trailer : जय श्री राम..! बहुचर्चित 'आदिपुरुष' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO
Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला... थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

शबरीने दिलेली बोरं, हनुमान रामाची अंगठी घेऊन बंदिवासात असलेल्या सीतेला भेटायला जाणं, श्रीरामाचा युद्धाप्रसंगी असलेला आक्रमक अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. विशेष गोष्ट क्रूर रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान ट्रेलरमध्ये एकदम शेवटी दिसतोय.

Adipurush Trailer : जय श्री राम..! बहुचर्चित 'आदिपुरुष' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO
महाराष्ट्रात चाललंय काय? रोज सरासरी ७० मुली गायब, महिन्याचा आकडा डोकं सुन्न करणारा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com