
मुंबई | Mumbai
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक या चित्रपटाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मनोज मुंतशीर यांनी ट्विट केले की, 'चित्रपटातील वादग्रस्त संवाद या आठवड्यात बदलून चित्रपटात नवीन संवाद समाविष्ट केले जातील. 3 तासांच्या चित्रपटात मी भगवान श्रीरामांसाठी 'जय श्री राम', 'शिवोहम', 'राम सिया राम'देखील लिहिले आहेत, परंतु त्या संवादांकडे कोणी लक्ष दिले नाही. अवघ्या ३ मिनिटांच्या वादग्रस्त संवादामुळे मला सनातन विरोधी म्हटले जात आहे.
वादग्रस्त डायलॉग ज्यावर लोकांचा आहे आक्षेप
कपड़ा तेरे बाप का! तेल तेरे बाप का! जलेगी भी तेरे बाप की। (हनुमंतांनी रावणचा मुलगा इंद्रजीतला म्हटले)
तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया। (इंद्रजीतने हनुमंताला म्हटले)
जो हमारी बहनों को हाथ लगाएगा उनकी लंका लगा देंगे। (हनुमंताने रावणाच्या सभेत म्हटले)
आप अपने काल के लिए कालीन बिछा रहे हैं। (विभीषणाने रावणाला म्हटले)
मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है। (लक्ष्मणावर वार केल्यानंतर इंद्रजीतने म्हटले)
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाचे कथानक ऋषी वाल्मिकी लिखित 'रामायणा'वर आधारित पौराणिक कथा आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीराम, क्रिती सेनॉन देवी सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानांच्या भूमिकेत आहे. आणखी एक मराठी अभिनेत्री या सिनेमात आहे, ती म्हणजे तेजस्विनी पंडित. तिने या सिनेमात शुर्पणखा साकारली आहे.