Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनधक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

मुंबई | Mumbai

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बारानगरमध्ये सुचंद्र दासगुप्ता यांचा ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री शुटिंग आटोपून ही अभिनेत्री आपल्या बाईकने घरी परतत होती.

नगर-पुणे महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस उलटली

बारानगर पोलिस ठाण्याजवळ, घोषपाडा याठिकाणी आल्यानंतर एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सुचंद्राने हेल्मेट घातले होते. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की तिच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते.

या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ वाहनांची वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यानंतर बारानगर पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून परिस्थिती सुरळीत केली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकालाही ताब्यात घेतले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे बंगाली चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे.

भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची कारला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

सुचंद्रा दासगुप्ता बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध बंगाली टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. ‘गौरी’मध्ये सहाय्यक भूमिका साकारून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या