अभिनेत्री श्वेता शिंदे
अभिनेत्री श्वेता शिंदे
मनोरंजन

अभिनेत्री श्वेता शिंदेने सेटवर पहा काय केलं..!

'डॉक्टर डॉन'च्या सेटवर पार्टी!

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई | Mumbai

शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करून, मराठी मालिका क्षेत्रातील चित्रीकरण सुद्धा सुरु करण्यात आलेले आहे. बाहेरील व्यक्तीला सेटवर येण्यास परवानगी नाही. तसेच सेटवरील कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही. या नव्या नियमांचा परिणाम म्हणून, एक वेगळेच वातावरण मालिकांच्या सेटवर पाहायला मिळत आहे.

'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेचे देखील नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. नुकतीच 'डॉक्टर डॉन'च्या सेटवरील सर्व कलाकारांना एक झकास ट्रीट मिळाली आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिने स्वतः केलेल्या पुऱ्या खाऊन सगळी मंडळी तृप्त झाली आहेत.

डॉक्टर डॉनची लाडकी डार्लिंग डीन, म्हणजेच आपली आवडती मोनिका स्वयंपाक करते आहे, असा एक सीन चित्रित करण्यात येत होता. या निमित्ताने, स्वयंपाकघरात शिरलेल्या श्वेताने सगळ्यांसाठी पुऱ्या तळायचं ठरवलं. सीनचं चित्रीकरण पूर्ण होताच, तिने खरोखरच पुऱ्या करायला सुरुवात केली. या कामात श्वेताची केशभूषा करणारी, तिची असिस्टंट सुद्धा मदतीला होती. ही अनोखी ट्रीट सगळ्यांनाच आवडली.

Deshdoot
www.deshdoot.com