प्राजक्ता माळीचा 'फिटनेस फंडा' आला समोर; पहा व्हिडिओ

प्राजक्ता माळीचा 'फिटनेस फंडा' आला समोर; पहा व्हिडिओ

मुंबई । Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. प्राजक्ता मराठी मालिका आणि चित्रपटांमुळे कायं चर्चेत कायम असते.

तसेच सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील ती शेअर करताना दिसते. प्राजक्ता अगदी फिटनेसवेडी आहे. आता देखील तिने सूर्यनमस्कार घालतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार घालताना तिच्या चाहत्यांनाही अशाचप्रकारे सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तिने हा एका तासाचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, '१०८ सूर्यनमस्कार... जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो. कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर, काय म्हणता, करणार का? जमेल तितके करा…' असे आवाहन देखील तिने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com