अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; 'या' जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; 'या' जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

मुंबई | Mumbai

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वातून घराघरात पोहचलेली आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर (Actress Apurva Nemlekar) दुःखाचा डोंगर कोसळला आहे...

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; 'या' जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
दुर्दैवी! सात महिन्याच्या चिमुकलीसह आईचा धरणात बुडून मृत्यू

अपूर्वा नेमळेकरचा भाऊ ओंकार नेमळेकरचे (Omkar Nemalekar) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. याबाबत अपूर्वा नेमळेकरने स्वत: इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली असून तिने भावाबरोबरचे काही फोटो पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; 'या' जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
मोदी सरकारच्या चुकीमुळेच पुलवामा हल्ला; जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट

अपूर्वाने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझा प्रिय भाऊ, शांतपणे विश्रांती घे. आयुष्यात कधी कधी नुकसान होते. ते असे असत कि कधीही बदलले जाऊ शकत नाहीत. तुला गमावणे ही मला जगण्याची सर्वात कठीण गोष्ट आहे. मी तुझा निरोप घ्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायला तयार नव्हते. मी आणखी एका दिवसासाठी काहीही करायला तयार आहे, फक्त एक सेकंद. पण मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाही. काही बंध तोडता येत नाहीत. मी कायम माझ्यासोबत ठेवीन, कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण त्या दिवसापर्यंत, तू अजूनही माझ्यासोबत आहेस. माझ्या बाळा तुला लवकरच भेटेन.' अशा भावना अपूर्वाने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी (Fans) कमेंट करत तिला धीर दिला आहे. तसेच अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत हे कसं झालं, असा प्रश्न तिला विचारला आहे. त्यावर अपूर्वाने तो २८ वर्षांचा होता. त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्याचे निधन झाले, असे कमेंट करताना म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com