
मुंबई | Mumbai
आज संपुर्ण देशाच लक्ष जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या (Jiah Khan suicide case) कोर्टाने दिलेल्या निकालाकडे लागून होते. याप्रकरणात सूरज पांचोलीची ( (Sooraj Pancholi)) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दहा वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी आज कोर्टान निकाल दिला. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज निकाल देताना कोर्टाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयात निकालादरम्यान जिया खानची आई देखील उपस्थित होती.
न्यायालयाने निकाल सुनावण्यापूर्वी जियाची आई राबिया यांनीही त्यांच्या वकिलामार्फत आज अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने राबिया खान यांच्या अर्जावर विचार केला नाही आणि निकाल देताना सूरज पांचोलीची जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. यापूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते आणि त्यानंतर दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.
3 जून 2013 रोजी जियाने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाची आई राबिया यांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. जियाच्या आत्महत्येनंतर 7 जून रोजी पोलिसांना तिच्या घरातून 6 पानी सुसाईड नोट मिळाली होती. त्या सुसाईड नोटमध्ये जियाने सूरज पांचोलीचा उल्लेख केला होता.सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, जिया आणि सूरज रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. मग हळूहळू दोघेही एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. नात्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे जिया खूप अस्वस्थ होती.
जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने तिला असे काही मेसेज पाठवले होते, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती, असे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरजने जियाला 10 मेसेज पाठवले होते, ज्यांची भाषा खूपच वाईट आणि अभद्र होती. आत्महत्येच्या दिवशी जियाने सूरजला अनेकवेळा फोन केला, पण त्याने जियाशी बोलणे टाळले. जियाने तिच्या पत्रात सुरज पांचोलीबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. त्याने केवळ जियाला दुःख यातनाच दिल्या असल्याचेही जियाने त्या पत्रात लिहिले होते.