शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; काय आहे प्रकरण?

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; काय आहे प्रकरण?

मुंबई l Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. (Actor Shilpa Shetty’s husband Raj Kundra arrested for allegedly making porn films)

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राल अटक करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक पत्रक जारी करत दिली आहे.

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले असता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर सोमवारी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. कुंद्राला आज (२० जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

दरम्यान या प्रकरणात राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक केली आहे. रायन जॉर्न थाँर्प असे या आरोपीचे नाव असून हा वेरूळचा राहणारा आहे. मालवणी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. यापूर्वी याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ व मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक केली होती‌. पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com