बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. त्यांचे जवळचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे...

अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम मिळाला. सतीश Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति. असे त्यांनी म्हटले आहे.

सतीश कौशिक यांचे पूर्ण नाव सतीश चंद्र कौशिक असे होते. त्यांच्या जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये झाला. ते उत्तम अभिनेत्यासह निर्माते आणि दिग्दर्शक आणि विनोदी कलाकारही होते. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

'जाने भी दो यारो' या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका केली. १९८३ मध्ये हा चित्रपट आला होता. त्यानंतर त्यांनी वो सात दिन, मासूम, मंडी, उडान, उत्सव, सागर, मोहब्बत, मि. इंडिया काश, उत्तर दक्षिण, ठिकाणा, जलवा, एक नया रिश्ता, राम लखन, वर्दी, जोशिले, प्रेम प्रतिग्या, आग से खेलेंगे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत यांनी भूमिका केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शर्माजी नमकीन, थार आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या छत्रीवाली आणि इमर्जन्सी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com