अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल
मनोरंजन

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल

नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला शनिवारी सायंकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. Bollywood actor Sanjay Dutt

संजय दत्तला शनिवारी अचानक श्वसनाचा आणि छातीत त्रास सुरू झाला. त्यामुळे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला नाही.

सध्या संजय दत्तला लिलावती रुग्णालयातील नॉन कोविड आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. काही चाचण्यांचे रिपोर्ट अजून प्रलंबित असून, डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले आहेत. संजय दत्त याची प्रकृती स्थिर असून, नॉन कोविड रुग्णांसाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमावलीनुसार उपचार केले जात आहेत, अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवीशंकर यांनी सांगितलं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com