Saira Banu Admitted : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात, प्रकृती चिंताजनक

Saira Banu Admitted : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात, प्रकृती चिंताजनक

मुंबई | Mumbai

दिवंगत बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार (veteran actor Dilip Kumar) यांच्या पत्नी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू (Saira Banu) मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलच्या (Hinduja Hospital) आयसीयूमध्ये (ICU) दाखल आहे. (Saira Banu Health Update)

हृदयविकाराचा (Heart disease) सौम्य झटका आल्याने रक्तदाब वाढला आणि सायरा बानू यांची तब्येत बिघडली. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना मागील तीन दिवसांपासून रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू लागल्या होत्या. त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. सायरा बानू लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. (Actress Saira Banu Admitted To Hinduja Hospital)

सायरा बानू (Actress Saira Banu) यांचे पती दिलीप (Dilip Kumar) कुमार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची सायरा बानू या काळजी घेत होत्या. दिलीप कुमार रुग्णालयात असताना सायरा बानू (Saira Banu) त्यांच्या प्रकृती विषयी माहिती देत होत्या. त्यांच्या लग्नाला ५४ वर्षे झाली होती. आता सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com