हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

'हा' अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका
हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे पोस्टर रिलीज

थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची आज शनिवारी १३९ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिम्मित देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar).

या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिले आहे.

अभिनेता रणदीप हुड्डा हा या चित्रपटात विनायक दामोदर सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाची ऑगस्ट २०२२ पासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट प्रस्तुत केले जात असून निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com