मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पुणे | Pune

प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह (Aniket VishwasRao) त्याच्या आई व वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण (Sneha Chavan) ने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात (Pune police) गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या पत्नी स्नेहा चव्हाण हिने पती, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पोलिस तक्रारीने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

प्रकरण काय नेमकं आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल. या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. २०१८ मध्ये त्याचा आणि स्नेहा चव्हाणचा विवाह झाला आहे. स्नेहा यादेखील अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. अनिकेतने पोस्टर बॉईज,मस्का, बस स्टॉप या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिकेतने अभिनयक्षेत्रातील पदार्पण नकळत सारे घडले या नाटकाद्वारे केले. तसेच त्याने ऊन-पाऊस आणि कळत नकळत या मालिकांमध्ये काम केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com